अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन वेश्या व्यवसायास लावले

मुल्ला कटरसह चौघांविरुद्ध पोक्सोअंतर्गत कारवाई
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन वेश्या व्यवसायास लावले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून धर्म बदलून निकाल केला व गेली तीन वर्ष तिच्यावर अत्याचार करणार्‍या मुल्ला कटरचे हे प्रकरण ताजे असतानाच श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मधील बजरंग चौकात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर तिघा जणांनी अत्याचार करुन तिला बळजबरीने वेश्या व्यवसायाला लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मुल्ला कटरसह चौघांविरुध्द पोक्सोअंतर्गत कारवाई केली आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, बजरंग चौक परिसरातील एका अल्पवयीन मुलीस मागील वर्षीच्या गणेशोत्सवाच्या काळात एका महिलेने आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी या अल्पवयीन मुलीस मारहाण करुन तिच्या आईला जिवे मारण्याचा धमकी देवून तिघा जणांनी आळीपाळीने तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. त्यानंतर चार पाच दिवसानंतर यातील आरोपींनी या अल्पवयीन मुलीस तिच्या इच्छेविरुध्द तिच्या आईच्या रखवालीतून तिचे अपहरण करत तिला एक़ा पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बळजबरीने पांढरी पुल येथील एका डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी नेले.

या ठिकाणचा वेश्या व्यवसाय बाबा चेंडवाल नावाचा व्यक्ती चालवत असतो. श्रीरामपुरातील या तिघा जणांनी या अल्पवयीन मुलीस बाबा चेंडवाल यांच्या ताब्यात देवून त्या बदल्यात पैसे घेवून वेश्या व्यवसायासाठी त्या अल्पवयीन मुलीस विकून टाकले. त्यानंतर मुल्ला कटर, पप्पू गोरे व व बाबा चेंडवाल यांनी शेवगाव येथे खोली भाड्याने घेवून या अल्पवयीन मुलीस बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले व तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्या पैशावर उदरनिर्वाह केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेतली असून पोलिसांनी सचिन उर्फ पप्पू गोरे, इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर व बाबा चेंडवाल यांचेविरुध्द भादंवि कलम 366(अ), 368, 370 (4) 370 (अ),(1), 372, 373, 376 (2)(एन) सह पोक्सो कायदा कलम 3, 4, 5 (जी) 6, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पांढरीपूल येथील बाबा चेंडवाल, एक महिला आरोपी यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com