
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील मागील 10 वर्षापासुन फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. सचिन संभाजी बर्डे (वय 30 रा. कौंडगाव आठरे ता. पाथर्डी) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिले आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, सुरेश माळी, संदीप घोडके, शंकर चौधरी, सागर ससाणे व रोहित येमुल यांचे पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीतील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत रवाना केले होते. पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सचिन बर्डे हा फरार असुन तो कौंडगाव आठरे येथे त्याचे राहते घरी आला आहे, अशी माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.
त्यांनी पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना केल्या. पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी कौडगाव आठरे येथे जावुन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवुन सापळा लावुन आरोपी सचिन बर्डे याला ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.