पुणतांब्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

खरीप पिकांना फटका; शेतकरी चिंतेत
पुणतांब्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

पुणतांबा (वार्ताहर)

परिसरात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी यासारख्या खरीप पिकांना त्याचा फरका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

परिसराचे सरासरी पर्जन्यमान 500 मि.मीटर आहे. आतापर्यंत शेती महामंडळाच्या चांगदेवनगर मळ्यावर असलेल्या पर्जन्यमापकामार्फत अंदाजे 510 मि.मीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती महामंडळाचे लिपिक सुनील कराळे यांनी दिली. पावसामुळे परिसरातील ओढे-नाले, बंधारे तुडूंब भरून वाहत आहे. विहिरीच्या पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झालेली आहे. गुरुवारी रात्री परिसरात पुन्हा पावसाने हजेरी लावली.

परिसरात सरासरी एक इंच पावसाची नोंद झाली आहे. सध्या परिसरात बर्‍याच ठिकाणी सोयाबीन पिकाची सोंगणी व काढणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे या कामामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे सोयाबीन सोंगणीचे काम पूर्णपणे थांबले असून सध्या सोंगणी केलेले सोयाबीनचे पीक शेतात पडन आहे. पाऊस थांबला नाही तर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका सोयाबीन पिकाला बसण्याची शक्यता आहे. सोंगणी केलेले पिके झाकण्यासाठी शेतकरी वर्ग प्लॅास्टीकचे कागद घेऊन धावपळ करत असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com