पोलिसांना घ्यायचीय बोठेच्या घराची झडती

गर्भपात गोळ्या जप्त प्रकरण
पोलिसांना घ्यायचीय बोठेच्या घराची झडती
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी परिसरात औषध प्रशासन व पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांप्रकरणी आरोपी नितीन बोठे याच्या घराची झडती घेण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. घर झडतीची परवानगी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. दरम्यान बोठेचा शोध सुरू आहे.

एमआयडीसी येथे एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी टाकलेल्या छाप्यात गर्भपाताच्या नऊ हजार गोळ्या जप्त केल्या होत्या. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले यांच्या फिर्यादीवरून श्रीराम एजन्सीचा मालक नितीन बोठे याच्यासह आयव्हीए हेल्थ केअरच्या सर्व संचालकांविरूद्ध एमआयडीसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून बोठे पसार झाला आहे. त्याच्या घराची झडती घेण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच घराची झडती घेतली जाईल, असे आठरे यांनी सांगितले.

दरम्यान, ज्या औषध निर्माती कंपनीने गोळ्यांचा पुरवठा केला होता, त्या कंपनीला औषध प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीकडून कोणत्या मेडिकल एजन्सीला किती गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला, याची माहिती मागविण्यात आल्याची माहिती औषध निरीक्षक जावेद शेख यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com