नगरपालिकेची आगामी निवडणूक प्रहार स्वबळावर लढविणार : पोटे

नगरपालिकेची आगामी निवडणूक प्रहार स्वबळावर लढविणार : पोटे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशावरून श्रीरामपूर नगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविणार असून शहरातील सामान्यांच्या न्यायासाठी संघर्ष करण्याची पक्षाची तयारी आहे, प्रस्थापितांना सक्षम पर्याय फक्त प्रहारच असल्याचे प्रतिपादन पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी केले.

श्रीरामपूर शहरात प्रहारच्या चार शाखांचे उद्घाटन अभिजित पोटे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, संघटक बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर सांगळे, संजय वाघ, कृष्णा सातपुते, अ‍ॅड. पांडुरंग औताडे उपस्थित होते. प्रहारचे शहर कार्याध्यक्ष विवेक माटा यांच्या प्रयत्नातून शहरातील वॉर्ड नं.2 मध्ये गोल्ड सॉमील परीसर, गोंधवणी रोड, आदर्श नगर व पंचशिल नगर या 4 शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, विवेक माटा यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रहारचे शहराध्यक्ष सागर दुपाटी, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम बोरकर, उपाध्यक्ष शंतनू पाठक, युवा प्रहार शहराध्यक्ष राहुल गायकवाड, कार्याध्यक्ष शाहरुख कुरेशी, विद्यार्थी आघाडीचे संघटक किरण पवार, कार्याध्यक्ष संतोष खरात, सोशल मीडिया शहर उपाध्यक्ष आबेद बागवान या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी सद्दाम पठाण, प्रताप रासकर, सनी त्रिभुवन, सनी त्रिभुवन, अरुण त्रिभुवन, नितीन साळवे, अरबाज पठाण, अल्ताफ पठाण, इम्रान पिंजारी, राहुल सावरिया, गणेश मस्के, विकी मस्के, आबेद बागवान, अफरोज सय्यद, अरबाज बागवान, मोबीन बागवान शेख, असिफ तांबोळी, किफायत शेख, खंडू पगारे, इमरान शेख, अब्दुल्ला पठाण, सनी चव्हाण, आयान पठाण, इरफान खान, शंतनू पाठक, हिदायत शेख, अक्षय कदम, ऋतिक चव्हाण, सनी कदम, अंकित यादव, समीर इनामदार, शुभम यादव, कर्तव्य देवरे, अभिजित कदम, साई चिटणीस, ऋतिक चव्हाण, संतोष खरात, किरण पवार, ओम जनवेजा, भरत पवार, दर्शन जिरंगे, प्रविण वैद्य, जयेश कोले, सनी अमोलिक, महेश शहाणे, सोयल शेख, सुरेश सोलंकी, मोसिन शेख, सुरेश पंडित, निलेश दीवर, दानिश शेख, पप्पू घारगे, भारत आंगरे, अमन पटेल, कामगार नेते नागेश सावंत, जावेद जागीरदार, इम्रान आजिज शेख, सद्दाम कुरेशी, वसीम कुरेशी, इमरान कुरेशी, मोसिन कुरेशी, बबलू शहा, सुलतान पठाण, तनवीर शेख, समीर शेख, तोफिक तांबोळी, शुभम गलिया, खान इरफान, मनियार नाझीम, तांबोळी रशिद, कुरेशी राशीत, शाहरुख बागवान, परवेज कुरेशी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com