श्रीरामपूर | प्रतिनिधी

करोना प्रादुर्भाव निर्माण झाला तेव्हा पासून ते हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतच्या काळात शेतकरी, छोटे व्यावसायिक, व्यापारी, संघटित असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार, या सर्वांचे विज बिल माफ करावे

या मागणी साठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ताधारी व बाकी सर्व विरोधी पक्ष यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला चड्डी-बनियान आंदोलन केले.

महाराष्ट्र सरकारने घेऊन सरसगट करोना काळातील विज बिल माप करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल माफ करा या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चड्डी-बनियान आंदोलन करण्यात आले. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, युवा अध्यक्ष अक्षय कुमावत, यशवंत जेठे, वक्ते प्रवीण जमदाडे, भैरव मोरे, भरत डेंगळे, अक्षय पवार, सागर देवकर,अभिजित राऊत, दीपक परदेशी आदी उपस्थित होते.