आई तुळजाभवानीची पालखी राहुरीतून आज तुळजापूरला होणार मार्गस्थ

आई तुळजाभवानीची पालखी राहुरीतून आज तुळजापूरला होणार मार्गस्थ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सालाबादाप्रमाणे महाराष्ट्राचे कुलदैवत तसेच राहुरीची माहेरवाशीण आई तुळजाभवानीची मानाची पालखी आज रविवार दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता राहुरीतून तुळजापुरला नवरात्र उत्सवास मार्गस्थ होणार आहे.

राहुरी येथील तुळजाभवानीच्या पालखी मंदिरात पालखीची राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व सौ.सुजाताताई तनपुरे यांच्या हस्ते सपत्नीक आरती होऊन राहुरी शहरातुन वाजत गाजत भव्य मिरवणूक होणार आहे. हि पालखी पालखी मंदिरातून, मानकरी शेटे घर, धोत्रे घर, शिवाजी चौक, तांबोळी वाडा, इंगळे परिवार, शनिमंदीर, लक्ष्मीनगर मार्गे अंबिकानगर, डावखर खळवाडी, गिरगुणे हॉस्पिटल, शुक्लेश्वर चौक, कानिफनाथ चौक, क्रांती चौक, राजवाडा परिसर, पीपल्स बँक मार्गे मठावरून कोळीवाडा परिसरातून गणपती घाटावरुन देसवंडीला रवाना होणार आहे. राहुरी शहरातील भाविकांनी पालखी मिरवणुकीत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी, आवाहन पालखी उत्सव समीती राहुरी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com