आधार नोंदणीशिवाय संच मान्यता नाही

आधार नोंदणीशिवाय संच मान्यता नाही

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी केल्याशिवाय यावर्षीची संच मान्यता करण्यात येणार नाही. त्यामुळे शाळांनी या महिनाअखेर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याचे आवाहन राज्य शिक्षण संचालकांच्यावतीने करण्यात आले आहे. यावर्षी शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी विद्यार्थी पोर्टलवरती नोंदणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे प्रवेश इयत्तांमध्ये केले जात आहेत. प्राथमिक शाळा तर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असले तरी ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्याप झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांना शालेय पटसंख्येत गृहीत धरण्यात येणार नाही. त्यामुळे केवळ आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या वरती शाळांना शिक्षक मंजूर करण्यात येणार आहे. सप्टेंबर अखेर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यात यावी, असे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

शिक्षक घटण्याची शक्यता-

सध्या आधार नोंदणी प्रक्रिया न केलेले विद्यार्थी शाळेत प्रवेशित झाले आहेत. मात्र या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही असे विद्यार्थी शाळेच्या पटावर दिसत असले तरी हे विद्यार्थी प्रत्यक्ष संच मान्यतेसाठी धरण्यात येणार नाहीत. त्यामुळे शाळांना शिक्षक कमी प्रमाणात मंजूर होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com