VIDEO : जिरायती टापूतील आडगाव झाले पाणीदार

पाझर तलावासह ओढेनाले तुडूंब : रब्बीहंगाम झाला शाश्वत
VIDEO : जिरायती टापूतील आडगाव झाले पाणीदार

आडगाव (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील जिरायत भागातील आडगाव बुद्रक, खुर्द, खडकेवाके, पिंपरी निर्मळ, पिंपळस आद गावांना वरदान ठरणार आडगाव बुद्रुक येथील पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. गणरायाच्या आगमनानंतर सलग दहा दिवस कोसळलेल्या वरूणराजाने आडगाव येथील पाझरतलाव, ओढे, नाले तुडूंब भरल्याने आडगाव पाणीदार झाले आहे. रब्बीचा हंगाम शाश्वत झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

गत तीन वर्षापासून निसर्गाच्या कृपेमुळे हा पाझरतलाव सलग तिसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला. या पाझर तलावाचा फायदा दोन्ही आडगाव, खडकेवाके, पिंपरी निर्मळ, केलवड आदी गावांना फायदा होतो. यामुळे शेकडो एकर शेती ओलिताखाली येते. रब्बी हंगामात पाझर तलावच्या पाण्यावर रब्बीतील गहु, हरभरा, कांदे, मका, ऊस, जनावरांची चारा पिके या परीसरात शाश्वत घेता येतात. त्यामुळे हा पाझर तलाव परीसरासाठी वरदान ठरला आहे.

राहाता तालुक्याच्या पश्चिम भागातील पर्जन्यछायेत येणारी दुष्काळी टापुतील ही गावे कायमच दुष्काळाच्या झळा सोसतात. निळवंडे धरणाचे पाणी या परीसराला मिळणार असल्याने येथील शेतकऱ्यांच्या आशास पल्लवीत झाल्या. मात्र राजकीय गर्तेत सापडलेले निळवंडे धरण 40 वर्ष झाले तरीही अपूर्ण आहे. मात्र निसर्गाच्या कृपमुळे सलग तीन वर्षापासून पाझर तलाव भरत असल्याने येथील शेतीसह दुग्धव्यवसायाने कात टाकली आहे.

शेकडो एकर शेती ओलिताखाली आल्याने अन्नधान्यासह, सोयाबीन, मका, ऊस, कांदा आदी पिकांचे विक्रमी उत्पादन विथील कष्टकरी शेतकन्यांनी घेतले. दुग्ध व्यवसायानेही येथे मोठी भरारी घेतली असून एकट्या आडगावमध्ये दररोज १५ ते २० हजार लिटर दुधसंकल होते. अनेक तरूण दुध व्यवसायाकडे वळाले आहेत. त्यामुळे गावात आर्थिक संपन्नता आली. विषेश म्हणजे दुष्काळी टाप्तील आडगाव पाणीदार झाले आहे.

५० वर्षापासून निळवंडेच्या पाण्याची वाट पहात आमच्या बापजाद्यांची पिढी खपली. आम्हीही पन्नाशीकडे झुकलो. मात्र निळवंडेचे पाणी पहावयास मिळाले नाही. निसर्गाच्या कृपेने ५० दिवसात आडगाव येथील सर्व तलाव भरले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निळवंडे धरणाचे पाणी आमच्या जिरायत भागाला मिळाले तर येथील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांचे जीवन समृध्द होईल.

दिनकर कडलग, प्रयोगशिल शेतकरी आडगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com