अज्ञात वाहनाच्या धडकेत पळवे येथील युवक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पळवे येथील युवक ठार

पारनेर | तालुका प्रतिनिधी

अहमदनगर-पुणे महामार्गावर पळवे फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पळवे येथील युवक जागीच ठार झाला. मनोज रामचंद्र कुलकर्णी (वय 35) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मनोज कुलकर्णी हे सुपा येथुन पळवे येथे घरी जात असताना अहमदनगर-पुणे महामार्गावर म्हस्णे फाटा चौक ते पळवे फाटा या दरम्यान अज्ञात वाहनाने कुलकर्णी यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक जोराची असल्याने मनोज कुलकर्णी जबर जखमी झाले. अपघातास कारणीभूत असलेला वाहनचालक निघुन गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे .

अज्ञात वाहनाच्या धडकेत पळवे येथील युवक ठार
इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत ३५ जणांनी गमावला जीव

अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस व रुग्णवाहीका चालक सादिकभाई आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. कुलकर्णी यांना तात्काळ सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना रुग्णवाहीकेतच तपासले असता त्याचे निधन झाल्याचे सांगितले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पळवे येथील युवक ठार
नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार

सुपा पोलिसांनी सदर मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पुढील सोपस्कर पुर्ण करण्यासाठी पाठवला. सुपा पोलिस घटनेची माहिती घेत असुन सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस पुढील तपास करत आहेत

अज्ञात वाहनाच्या धडकेत पळवे येथील युवक ठार
अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com