कारच्या धडकेत श्रीरामपूर येथील युवकाचा मृत्यू

कुठे घडली घटना?
कारच्या धडकेत श्रीरामपूर येथील युवकाचा मृत्यू
file photo

अहमदनगर|Ahmedagar

कार व दुचाकीची धडक (Car and bike accident) होऊन दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला आहे. आकाश विजय जेधे (वय 24 रा. दत्तनगर, श्रीरामपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

नगर- जामखेड रोडवरील (Nagar-Jamkhed Road) दशमीगव्हाण (Dashamigavhan) (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Police Station) कार चालक नवनाथ माधव ठोंबरे (रा. देऊळगाव घाट ता. आष्टी जि. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशिष राजेश कर्डक (रा. वार्ड नं. 1, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात नवनाथ ठोंबरे व इतर तिघे जखमी झाले आहेत.

आकाश जेधे त्यांच्या दुचाकीवरून नगर- जामखेड रोडने प्रवास करत असताना कार चालक ठोंबरे याने दशमीगव्हाण शिवारात रॉग साईटने कार चालवून आकाश यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या आकाश यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करीत आहे.

Related Stories

No stories found.