कमी किंमतीत मासे न दिल्याने महिलेवर कोयत्याने हल्ला

कमी किंमतीत मासे न दिल्याने महिलेवर कोयत्याने हल्ला

पारनेर तालुका | प्रतिनिधी

कमी किमतीत मासे न दिल्याने आदिवासी महिलेवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे घडली. रामभाऊ गागरे (रा. मांडवे खुर्द) असे हल्ला करणार्‍या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी मासे विक्री करणार्‍या आदिवासी महिलेने कमी किंमतीमध्ये मासे दिले नाही. हे कारण काढून गागरे याने आदिवासी महिलेवर धारदार कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. आदिवासी महिलेला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वरचे पोलीस करत आहेत.

दरम्यान हल्लेखोरास तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शबरी माता भिल्ल, आदीवासी विकास संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना देण्यात आले आहे. यावेळी शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष दीपक बर्डे, मोहन माळी, भिमाजी भांगरे, विकास बर्डे, अनिल पवार, पांडुरंग पवार, शांताराम गायकवाड, अरुण बर्डे, यांच्यासह शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्था संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com