श्रीरामपूर शहरातील महिलेचा करोनामुळे मृत्यू

सदर महिलेवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते
श्रीरामपूर शहरातील महिलेचा करोनामुळे मृत्यू

श्रीरामपूर | Shrirampur

शहरातील मोरगे वस्ती भागातील एका करोणा ग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर 50 वर्षांची महिला आज सकाळी 7 च्या सुमारास लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत असतांना मयत झाली आहे.

या महिलेला पॅरॅलीसस सदृश आजार होता. कोमात गेल्यावर ती त्यातून बाहेर आली होती व सुधारणा होत असताना अचानक तब्बेत ढासळून दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. सदर मृत महिलेचे अंत्यसंस्कार नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस यांच्या उपस्थितीत करोना प्रोटोकॉल प्रमाणे करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com