कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 3 एप्रिल रोजी सापडलेल्या 78 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची

रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 21 तर खासगी लॅब मधील 41 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 49 असे 111 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून चांदेकसारे येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 111 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील लक्ष्मीनगर येथील 3, बालाजीअंगण येथील 2, येवला रोड येथील 2, शारदानगर येथील 1, कोपरगाव येथील 10, शिवाजी रोड येथील 2, खडकी येथील 2, विजयनगर येथील 1, व्दारकानगर येथील 3, राम मंदिर रोड येथील 1, गांधीनगर येथील 3, गोकुळनगरी येथील 4, जुने पोस्ट आफिस येथील 1, साई सिटी येथील 1, इंदिरापथ येथील 6, बुब हास्पिटल येथील 1, इंशाननगर येथील 1, ओमनगर येथील 1, स्वामी सर्मथ नगर येथील 2, सुभद्रानगर येथील 1, विवेकानंदनगर येथील 3, निवारा सोसायटी येथील 1, गजानन नगर येथील 2, बालाजी अंगण येथील 1, डॉ.नाइकवाडे हास्पिटल येथील 1, श्रीराम नगर येथील 1, श्रद्धानगरी येथील 2, दत्तनगर येथील 1, कुंबळे वस्ती येथील 1, भारतपूर येथील 1 तर ग्रामीण मधील संजिवनी येथील 7, रंवदा येथील 1, कोकमठाण येथील 2, माहेगाव येथील 2, वारी येथील 1, शिगंणापुर येथील 2, मुर्शतपूर येथील 1, धामोरी येथील 1, जेऊर पाटोदा येथील 9, येसगाव येथील 4, जेऊर कुंभारी येथील 1, माहेगाव देशमुख येथील 2, टाकळी येथील 5, रेल्वे स्टेशन येथील 1, मळेगाव येथील 3, ब्राम्हणगाव येथील 1, संवत्सर येथील 1, धारंणगाव येथील 1, चांदेकसारे येथील 1 असे 111 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. तालुक्यात आज 4 एप्रिल पर्यंत 5 हजार 64 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून चार हजार 442 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 612 अॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत 25 हजार 26 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्यांची 19.68 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.25 टक्के असे आहे. तर 62 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.