बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी

मनपा आरोग्य समितीची आयुक्तांकडे मागणी
बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी लसीकरणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार 17 प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावे. करोनाच्या पुढील लाटेत तज्ज्ञांच्या मते लहान मुलांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. यासाठी शहरात बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी, अशी मागणी मनपा आरोग्य समितीच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, सदस्य संजय ढोणे, सदस्य सचिन जाधव, सदस्य सतीश शिंदे व अजय चितळे आदी उपस्थित होते. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळत आहेत. यात काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध होत नाही. तसेच काळ्या बाजारातून मोठी किंमत रुग्णांच्या नातेवाइकांना मोजावी लागत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. करोनचा आरटीपीसीआर तपासणीचा रिपोर्ट 24 तासांच्या आत देण्यात यावा, काही लॅबकडून वेळेवर रिपोर्ट दिला जात नसल्याने करोना बाधित रुग्णांकडून संसर्ग होण्याची शकता आहे. नागरिकांमध्ये करोनाची जनजागृती करण्यासाठी घंटा गाड्यांवर ध्वनिफीत लावण्यात यावी, आदी आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com