संतप्त नागरिकांनी काढली कोपरगाव-संगमनेर रस्त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

संतप्त नागरिकांनी काढली कोपरगाव-संगमनेर रस्त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

सोनेवाडी | वार्ताहर

सध्या कोपरगाव संगमनेर राज्यमार्गाची चिखल आणि खड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. नागरिक, विद्यार्थ्यांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता रस्ताच शिल्लक राहिला नसल्याने पोहेगाव येथील संतप्त नागरिकांनी रस्त्याचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. तसेच लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

कोपरगाव संगमनेर रस्त्याची झालेली दुरवस्था बघता कोपरगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते ॲड. योगेश खालकर यांच्या नेतृत्वाखाली पोहेगाव जवळ रस्त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी पोहेगाव ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रवाशांनी तीव्र स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना रस्त्याच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी ॲड. योगेश खालकर, सतीश गवळी, प्रवीण अवताडे, निखिल अवताडे, रमजान शेख, किरण रोहमारे, विनोद रोहमारे, आनंद पानगव्हाणे, राजेंद्र पानगव्हाणे, अजय रोहमारे,संजय सुपेकर, माधव गायकवाड, ॲड. अनंत शिंदे, ॲड. यतीन अवताडे, नवनाथ सोनवणे, रंगनाथ गव्हाणे, बजरंग गव्हाणे, संजय सुपेकर, ॲड. रमेश गव्हाणे, ॲड. संदीप रोहमारे, सनी रोहमारे, ओम रहमारे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com