नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

कोणतीही घटना घडली की पोलिसांची मदत घेतली जाते. चोर देखील पोलीसांना घाबरतात पण जेव्हा पोलिसांची गाडी चोरीला जाते तेव्हा.? अशीच एक घटना नेवासा तालुक्यात घडली आहे.

अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात बिनतारी संदेश कक्षात नेमणूकीस असलेले पोलिस हवालदार संजय किसन गायकवाड यांची रॉयल इन्फिल्ड कंपणीची बुलेट क्रमांक एम.जे.एफ. 2697नेवासा फाटा येथील सुयोग मंगल कार्यालयासमोरील त्यांच्या रहात्या घरासमोरुन चोरी झाली आहे. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय किसन गायकवाड (वय 46) रा.सुयोग मंगल कार्यालया समोर नेवासा फाटा यांच्या राहत्या घरासमोरुन गुरुवार दि.21 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास ड्युटीवर असतांना त्यांच्या बुलेटची चोरी झाली. बुलेट चोरीची माहिती मिळाल्यावर गायकवाड यांनी अनेकांकडे बुलेटची चौकशी केली परंतु ती मिळून न आल्यामुळे अखेर बुलेट चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.