धक्कादायक : बेड न मिळाल्याने रुग्णाचा रुग्णालयाच्या दारातच मृत्यू
File Photo

धक्कादायक : बेड न मिळाल्याने रुग्णाचा रुग्णालयाच्या दारातच मृत्यू

नगरच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार

अहमदनगर | Ahmednagar

रविवारी ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर

नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आणखी एक वेदनादयी प्रकार समोर आला आहे. त्याच दिवशी सायंकाळी श्रीरामपूरहून आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला बेड न मिळाल्याने त्याचा रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. मृतदेह दोन तास वाहनातच पडून होता. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा गाजत आहे.

श्रीरामपूर येथील एका रुग्णाची अशीच हृदयद्रावक अवस्था समोर आली आहे. रुग्ण गंभीर झाल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नातेवाईक खासगी वाहनातून रुग्णाला घेऊन आले. मात्र, त्यावेळी जिल्हा रुग्णालयात जागा नव्हती. त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला देण्यात आले.

नातेवाईकांनी शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये फिरून पाहणी केली. मात्र, कोठे बेड शिल्लक नव्हता. त्यामुळे रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथे आणत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला. याची माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह वाहनातून काढून आत घेण्याची विनंती केली. मात्र, यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. तोपर्यंत मृतदेह वाहनातच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com