खासगी बसमध्ये पुण्याच्या प्रवाश्याचा हृदय विकाराने मृत्यू

सुपा गावाजवळील प्रकार
खासगी बसमध्ये पुण्याच्या प्रवाश्याचा हृदय विकाराने मृत्यू

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

अमरावतीवरुन पुण्याला जात असलेले अशोक सावळेराम कुर्‍हाडे याचे सुपा दरम्यान हदयविकाराने निधन झाले आहे. चिखली-पुणे खासगी बस हा प्रकार घडला.

याबाबत किशोर जाधव यानी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीत म्हटले की, माझी बहीण जयश्री कुर्‍हाडे व अशोक कुर्‍हाडे व त्याच्या 12 वर्षाचा मुलगा आम्ही सर्व बुधवार (दि.10) अमरावती येथून चिखली-आळंदी पुणे येथे जाण्याची खाजगी लकझरी गाडीने जात असतांना....

पहाटेच्या दरम्यान सुपा गावाजवळ अशोक कुर्‍हाडे अचानक श्‍वसनाचा त्रास होवू लागल्याने त्यांना लक्झरी बस चालक याने नगर ते पुणे जाणारे रोडवर सुप्यात हार फुले विकणारे दुकानासमोर उतरवून तेथील लोकांचे मदतीने रुग्णवाहीका बोलावून घेवून लाईफ लाईन हॉस्पीटल सुपा औषधोपचारकामी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. कुर्‍हाडे हे पुण्यात खासगी बँकेत येथे नोकरीस होते. पोलीसांनी अकास्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com