गाव करोनामुक्त करण्यासाठी चळवळ उभारावी - पद्मश्री पवार

गाव करोनामुक्त करण्यासाठी चळवळ उभारावी - पद्मश्री पवार

तालुक्यातील ग्राम करोना दक्षता समितीला मार्गदर्शन

पारनेर (तालुका प्रतिनिधी) - हतबल समाजाला मानसिक आधार देण्याची मोठी गरज आहे. गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये गाव पुढे आले आणि गाव बदलले. पाणी फाउंडेशनमध्ये अनेक गावांनी चळवळ उभी केली, त्यातून बदल घडला. अशाच प्रकारची चळवळ गावाला करोनामुक्त करण्यासाठी गावांनी उभी करण्याची गरज आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पवार यांनी हिवरे बाजार करोनामुक्त केले आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात उल्लेख केला. त्या धर्तीवर पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी हिवरेबाजारची करोना मुक्त संकल्पना पारनेर तालुक्यात राबवण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने पारनेर तालुक्यातील ग्राम करोना दक्षता समिती तसेच सरपंच, लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सेवक यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीत पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. संकटाच्या काळामध्ये एकत्र येण्याचा विचार महत्त्वाचा आहे, तो विचारच आपल्या सर्वांना यातून बाहेर काढणार आहे. राज्यकर्ते धोरण ठरवतात, अधिकारी आपल्या पर्यंत आणतात. पण त्याचे उत्तम व्यवस्थापन गावाने करणे गरजेचे आहे. वाद-विवाद बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करा गाव जर उभा राहिले तरी यंत्रणा आपल्यासाठी काम करणार आहे ‘माझी सुरक्षितता माझी जबाबदारी’ हा संकल्प केला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com