अल्पवयीन मुलीवर होमगार्डने केला अत्याचार

गुन्हा दाखल || आरोपीस अटक
अल्पवयीन मुलीवर होमगार्डने केला अत्याचार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

होमगार्डचे काम करत असणार्‍या एका तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात होमगार्डविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरात दत्तनगर परिसरात राहणारा अनिल छगन बनकर (वय 42) याने एका 16 वर्षाच्या विद्यार्थीनीचा ती शाळेत जातांना पाठलाग करून तिच्याशी सलगी केली. तिला अमिष दाखवून लॉजवर व त्याच्या घरात या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. अनिल बनकर हा होमगार्डमध्ये बर्‍याच वर्षापासून कार्यरत होता. आरोपी विवाहित असून त्याला तीन मुले आहेत.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अनिल छगन बनकर याचेविरुध्द भादंवि कलम 354, 354 (ड), 376 (2) (एन) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम 3, 4, 5. (एल) 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल छगन बनकर यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवरे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com