शिर्डीत साकारण्यात येणार २५ हजार स्के.फुटाची भव्य रांगोळी

हजारो टन रांगोळीचा होणार वापर; रामनवमी यात्रा कमीटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांची माहिती
शिर्डीत साकारण्यात येणार २५ हजार स्के.फुटाची भव्य रांगोळी

शिर्डी | शहर प्रतिनिधी

श्री साईबाबांच्या (Saibaba) पवित्र पदस्पर्शाने पुनित झालेल्या मातीमध्ये गोमूत्र, शेण मिसळून २५ हजार स्केअर फुट जागेवर श्री साईबाबांची भव्य अशी रांगोळी (Saibaba Rangoli) साकारण्यात येत असून या रांगोळीसाठी हजारो टन रांगोळीचा वापर होणार आहे. दिव्य अशी बाबांची रांगोळी भाविकांना रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाण्यासाठी खुले केले जाईल अशी माहिती शिर्डी रामनवमी यात्रा कमीटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली.

दरम्यान शिर्डी शहरात यंदा रामनवमी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. रामनवमी उत्सवासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व शिर्डी ग्रामस्थ रामनवमी यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ एप्रिल २०२३ ते दि.१३ एप्रिल २०२२ पर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिर्डीत साकारण्यात येणार २५ हजार स्के.फुटाची भव्य रांगोळी
'साई'नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा

यामध्ये प्रथमच श्री साईबाबा संस्थानच्या साईनगर मैदानावरील दोन एकर जागेत भव्य दिव्य अशी श्री साईबाबांचे रांगोळी चित्र साकारण्यात येणार आहे. यासाठी मुंबई येथील साईभक्त मंडळाचे वीस कलाकार सहभागी होणार असून सुबक आणी मनमोहक रांगोळी काढणार आहे. त्यासाठी मैदानावर शेण व गोमूत्र मिसळून सारवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेणाची आवश्यकता आहे तसेच हजारो टन सफेद रांगोळी लागणार असल्याने ज्या भाविकांना बाबांच्या श्रद्धेपोटी रांगोळी देण्याची इच्छा आहे त्यांनी कमीतकमी एक किलो आणी जास्तीत जास्त कितीही देऊ शकतात. असे आवाहन रांगोळी कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

शिर्डीत साकारण्यात येणार २५ हजार स्के.फुटाची भव्य रांगोळी
साई परिक्रमा महोत्सवात साईबाबा संस्थानने सक्रिय सहभाग नोंदवावा

रांगोळी, शेण देण्यासाठी शिर्डी शहरातील साईनगर मैदानावर संपर्क साधावा असेही त्यांनी म्हटले आहे. सदरची रांगोळी काढण्यासाठी १ एप्रिलपासून सुरवात करण्यात येणार आहे. त्यावेळी प्रथम बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचे विधीवत पूजन करण्यात येणार असून त्याबरोबरच रांगोळी साकारणाऱ्या कलावंताचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले जाणार आहे. हि रांगोळी दि.९ एप्रीलपर्यत हे कलाकार दिवसरात्र काम करून पुर्ण करणार आहे.

रांगोळी पुर्ण झाल्यानंतर दि.१० एप्रिल रामनवमीच्या मुख्य दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पूजा करून भाविकांना पहाण्यासाठी खुले करून देण्यात येणार आहे. श्री साईबाबांच्या इच्छेनुसार काही कालावधीनंतर सदरची रांगोळी मिश्रित पवित्र माती गोळा करून ती शिर्डी शहरात लावलेल्या वृक्षांना टाकण्यात येणार आहे. तसेच बाबांच्या रांगोळीची माती ज्या भाविकांना आपल्या घरी तुलसी वृंदावनात टाकण्यासाठी हवी असेल त्यांनी घेऊन जावे.

शिर्डीत साकारण्यात येणार २५ हजार स्के.फुटाची भव्य रांगोळी
रंग खेलेंगे 'साई' के संग! शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह, पाहा VIDEO

या अदभूत अशा रांगोळीसाठी रामनवमी यात्रा कमिटीच्या वतीने नियुक्त केलेल्या रांगोळी कमिटीचे अध्यक्ष मुकुंदराव गोंदकर, उपाध्यक्ष मनिलालजी पटेल, प्रविण शिंदे, प्रकाश गोंदकर, विरेश चौधरी, प्रतिक शेळके, सोमनाथ कोते,दिनेश शिंदे, दत्तात्रय कोते,सचिन औटी, नितीन गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, जयंत गायकवाड, साईराज धुलसैदर, प्रथमेश गोंदकर, प्रमोद शेळके, नंदकुमार शेळके, सुनील बारहाते, योगेश काटकर, सतिश कोते,महेश कोते,नारायण थोरात, अरुण कोते, कैलास वारुळे, संतोष गोंदकर, अनिल कोते, रविशंकर गोंदकर, नकुल सोनवणे आदी ग्रामस्थ अहोरात्र मेहनत घेत आहे.

शिर्डीत साकारण्यात येणार २५ हजार स्के.फुटाची भव्य रांगोळी
VIDEO : साईंच्या शिर्डीतही होळीचा उत्साह; पारंपरिक पद्धतीने होलिका दहन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com