वडाळा महादेव (वार्ताहर) -
श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर चौकी परिसरात सकाळी नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली
आहे. मृतावस्थेत आढळलेल्या नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू कशाने झाला? याचे कारण समजू शकले नाही. सकाळीच ही बाब येथील नागरिकांच्या लक्षात येताच घडलेल्या घटनेची माहिती वनधिकार्यास देण्यात आली.
वनसंरक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विकास पवार, लांडे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनाधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी करत स्थानिक नागरिकाच्या मदतीने पंचनामा केला. बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती.