विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त

विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले (Akole) शहरापासून जवळच असणाऱ्या गर्दनी (Gardani) गावचे शिवारात एक बिबट्या (Leopard) विहिरीत (Well) पडला होता. वनखात्याने (Forest Department) ग्रामस्थांच्या सहकार्याने अखेर त्याला विहरीत (Well) सोडलेल्या पिंजऱ्यात बंदिस्त करीत बाहेर काढले. गर्दनी शिवारात भक्ष्याच्या शोधात असणारा बिबट्या (Leopard) मध्यरात्रीच्या सुमारास गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वसंत मंडलिक यांचे विहरीत (Well) पडला. सकाळी विहिरीजवळ गेलेल्या मंडलिक यांचे लक्षात ही बाब आली.

त्यांनी वनविभागास (Forest Department) ही माहिती दिली. त्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहीरीत पिंजरा (Leopard cages) सोडला. काही वेळातच बिबट्या पिंजऱ्यात (Leopard cages) अडकला. नंतर या बिबट्याला (leopard) पिंजऱ्यासह बाहेर काढण्यात आले. हा मादी जातीचा बिबट्या असून तो अंदाजे तीन वर्षे वयाचा असावा. त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. तालुक्यातील प्रवरा परिसरात अलीकडे बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. मागील महिन्यात याच परिसरातील सुगाव खुर्द (Sugav Khurd) येथे एक लहान मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com