अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

माणिकदौंडी परिसात रात्री घटना
File Photo
File Photo

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील हरीचातांडा येथे रस्त्यावर सोमवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन महीन्याचा बिबट्याचा बछडा ठार झाला आहे. वन विभागाने अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

File Photo
पुणतांब्यात अतिक्रमणे काढण्याबाबत नोटीसा

पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पुुर्ण करून बछड्यावर वनविभागाच्या नर्सरीमधे अत्यसंस्कार करण्यात आले. बछड्याच्या मृत्युमुळे त्याची आई बिबट्याची मादी उग्र होवु शकते परीसारातील नागरीकांनी सावध रहावे व रात्रीच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन पाथर्डी वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी केले आहे.

File Photo
कार अचानक पेटल्याने चालक गंभीर जखमी

हरीचातांडा येथील रस्त्यावर रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचे दोन महीन्याचा बछडा ठार झाला. येथील ग्रामपंचायत सदस्य शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना ही माहीती दिली. अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत बछडयाला पाथर्डी येथील वनविभाग कार्यालय परिसरात आणले येथील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाच्या नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

File Photo
श्रीक्षेत्र ताहाराबादला जाताचा पायी दिंडीतच देवळालीच्या वारकर्‍याचा मृत्यू

माणिकदौंडी परिसरातील हरीचातांडा, आल्हनवाडी, घुमटवाडी, धनगरवाडी, चेकेवाडी परीसरातील नागरीकांना सावध रहावे. बिबट्याचे पिलु गेल्यामुळे त्याची आई क्रोधीत होवु शकते.यामुळे रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी. घराच्या बाहेर झोपु नये. पशुधन उघड्यावर बांधु नये. रात्रीच्या वेळी घरासमोर पुरेसा उजेड असावा. लहान मुलांना एकटे घराबाहेर सोडु नये. पशुधनाचे नुकसान झाल्यास अथवा बिबट्या दिसल्यास वनविभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करावा

- अरुण साबळे, वनपरीक्षेत्र अधिकारी पाथर्डी

चेकेवाडी येथील एका शेतक-यांच्या शेळीवर बिबट्याने मंगळवारी हल्ला केल्याची घटना घडली आहे.नागरीकामधे भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याची मादी बछडा गेल्याने पशुधनावर व माणसावरसुद्धा हल्ला करु शकते अशा भितीने नागरीक शेतामधे जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने येथे तातडीने पिंजरा लावावा.

- सुनिल ओव्हळ, माजी पंचायत समिती सदस्य

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com