माळवाडगाव शिवारात बिबट्याची बछडे आढळली

माळवाडगाव शिवारात बिबट्याची बछडे आढळली

माळवाडगाव (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव शिवारात शेती महामंडळाच्या जमिनी करार पध्दतीने पिकविण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत.

५० एकर ऊस प्लाटमध्ये सरी लोटण्याचे काम सुरू असताना मजुरांना बिबट्याची बछडे आढळून आली. धाडसाने मोबाईलवर फोटो घेत असताना बिबट्या मादीच्या डरकाळीचा आवाज येताच मजुरांनी ऊसाबाहेर धूम ठोकली.

माळवाडगाव येथील कार्यकर्त्यांना घटनेची माहिती देताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन विभागास घटनेची तातडीने खबर देण्यात आली. धनपाल श्री. लांडे यांनी ऊस पट्ट्याकडे कुणीही जाऊ नका, अशा सूचना दिल्या. कारण बिबट्या मादी बछड्यांना सोडून पलायन करत नाही.

आज संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून पिंजरा बसविण्यात येईल, असे असे आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. मात्र परिसरातील शेतकऱ्यांत घबराट निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com