अहमदनगर (प्रतिनिधी) -

राज्यात बर्ड फ्ल्यू शिरकाव झाला असून त्याच पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी गावात 50 कोंबड्या मृत पावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मिडसांगवी

गावापासून दहा किलो मिटर अंतरापैकी 5 किलो मिटर अंतराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मंगळवारी जामखेड तालुक्यात एक कावळा मृत पावला असून त्याचे रक्ताचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पशूसंवर्धन विभाग सर्तक झाला आहे. जिल्हा प्रशासनाने 78 पथके तैनात केली असून त्याव्दारे बर्ड फ्ल्यू वर वॉच ठेवण्यात येत आहे. पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी गावातील मृत कोंबड्याच्या पार्श्वभूमीवर आधी गावापासून एक किलो मीटर अंतरापर्यंत मांस आणि चिकन विक्रीच्या दुकाने बंद करण्यात आलेले आहेत. यासह 10 किलो मीटर अंतरावर बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पशूसंवर्धन विभागाची टीम सर्वेक्षण करून पक्ष मृत पावलेले की याची खात्री करत आहेत.

पाथर्डीतील मृत कोंंबड्या आणि जामखेड तालुक्यातील मृत कावळ्याचे नमुने घेवून त्या पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी तपासणीत काही आढळल्यास ते नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.