दुर्दैवी! पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना वडीलांचाही मृत्यू

दुर्दैवी! पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना वडीलांचाही मृत्यू

कोपरगाव | प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथील मंडपी नाल्यात बुडून बापलेकाचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

दुर्दैवी! पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना वडीलांचाही मृत्यू
जिल्ह्यात दुर्घटनांची मालिका; मासे पकडण्यासाठी गेलेली महिला व पुरुष ओढ्याच्या पाण्यात बुडाले

यात सचिन संजय मोरे वय 15 व संजय मारूती मोरे वय 35 यांचा बुडून मृत्यु झाला आहे. मुलाला वाचविताना वडीलांचाही मृत्यु झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी सोमवारी रात्री कोपरगाव परीसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने परीसरातील ओढे नाले ओसांडून वहात आहे. मंगळवारी दुपारी वडील संजय मोरे यांच्याबरोबर मुलगा सुनिल मंडपी नाल्यावरून जात असताना सुनिलचा तोल जावून तो नाल्यात पडला. ही बाब वडील संजय यांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात उडी घेवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मुत्यु झाला.

दुर्दैवी! पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना वडीलांचाही मृत्यू
हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

बापलेक पाण्यात बुडाल्याची माहिती आसपासच्या नागरीकांना मिळाल्यानंतर काही तरूणांनी पाण्यात उड्या घेवून या बापलेकांना पाण्याच्या बाहेर काढले. त्यांना संजीवनीच्या रूग्णवाहीकेतुन ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. एकाच कुटूबातील दोघांचा मृत्यु झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनास्थळी तहसिलदार व पोलिस निरीक्षक तसेच संजीवनी कारखान्याची आपत्तीव्यवस्थापन टिम उपस्थित होती.

Related Stories

No stories found.