साकुरीत बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार, संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

FIle Photo
FIle Photo

राहाता | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील साकुरी येथील नांदूरखी -साकुरी रस्त्या रस्त्या लगत असलेल्या मनोज लुटे यांचे साई समर्थ ऑईल मिलमध्ये काल रात्री बिबट्याने त्यांच्या कंपाऊंडवर उडी मारून आत प्रवेश करून त्याने एक कुत्रे फस्त केले. हा सर्व प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

साकुरी परिसरातील बनसोडे वस्ती भागातील 3-4 शेळ्या त्याने महिनाभरात फस्त केल्या. त्या भागात बिबट्याचे महिना भरापासून वास्तव्य आहे. रविवारी रात्री या बिबट्याने मनोज व अनिल लुटे यांच्या समर्थ ऑइल मिलमध्ये कंपाऊंड वर उडी मारून आत प्रवेश मिळवला. आत बांधलेले कुत्रे त्याने फस्त केले. त्या नंतर पुन्हा त्याने कंपाऊंड वरून उडी मारून पाळायन केले. हा संपूर्ण थरार सीसी टीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com