केदारनाथ येथे कोसळलेल्या दरडीत श्रीगोंद्याची भाविक महिला ठार

जखमी प्रवाशात जिल्ह्यातील चौघांचा समावेश
केदारनाथ येथे कोसळलेल्या दरडीत श्रीगोंद्याची भाविक महिला ठार

श्रीगोेंदा (प्रतिनिधी)

केदारनाथ- बद्रिनाथ देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या एका वाहनावर दरड कोसळल्याने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर राम साळुंके (वय 38 वर्ष) रा. हिरडगाव (ता. श्रीगोंदा) हे जखमी झाले आहेत. यांच्यासह ९ प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये तीन प्रवासी हे नगर जिल्ह्यातील आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी, हिरडगाव येथील टुरिस्ट मार्फत श्रीगांद्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले, संगिता चंद्रशेखर पाचपुते, सुशिलाबाई वसंतराव वाबळे, हेमा विलास जाधव, नंदा अरुणराव भोसले व आणखी ५ महिला अशा १० महिला सर्व एकमेकांचे नातेवाईक हे केदारनाथ-बद्रिनाथ देवदर्शनासाठी १५ जूनपासून गेले होते, तसेच ८ जुलैला परत येणार होते.

दरम्यान २९ जुन रोजी देवदर्शन झाल्यानंतर डोंगरावरून परत खाली येतांना या गृप मधील ९ महिला पायी येत होत्या, तर मयत पुष्पा भोसले व रामा सांळुखे व अन्य ९ जण एका वाहनाने खाली येत असताना केदारनाथ यात्रेचा मुख्य थांबा असणार्‍या मुकटिया येथे डोंगराच्या माथ्यावरून कोसळलेल्या ढिगार्‍या मयतांचे वाहन सापडले. या अपघातात संबंधीत मयत आणि जखमी झाले आहे.

या अपघातात वाहनातील १० जण जखमी झाले, तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. पोलीस आणि आपत्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ३.५० वाजता केदारनाथ महामार्गावरील मुंकटियाजवळील डोंगरावरून अचानक दगड पडले. एका प्रवासी वाहनाला त्याची धडक बसली. जखमींपैकी पाच महाराष्ट्रातील नगर, तीन बिहारमधील पाटणा, एक स्थानिक रहिवासी आणि दोन नेपाळ मधील आहेत. जखमींमध्ये एका १२ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.

जखमी प्रवाशांची यादी

कृष्णा भाले (वय 12, रा.नगर), ज्योती बाळासाहेब काळे (वय 40, रा. नगर), कल्पना रंगनाथ काळे (वय 59, रा. कर्जत, नगर), राम साळुंके (वय 38, हिरडगाव ता. श्रीगोंदा जिल्हा नगर), गौतम कुमार (वय 24, रा. पाटणा, बिहार) शिवकुमार (वय 21, रा. पाटणा, बिहार), अंकित शर्मा (वय 21. रा.बिहार), पलामन (वय 30, रा.नेपाळ) टिकाराम (वय 32, रा. नेपाळ), रमेशसिंग सिंग (वय 36, रा.बदासू रुद्रप्रयाग) यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com