वीज दर निकष बदलण्यासाठी समिती स्थापणार

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांची जनता दरबारात माहिती
वीज दर निकष बदलण्यासाठी समिती स्थापणार

करंजी |वार्ताहर| Karanji

जिरायती भागातील शेतकर्‍यांना पाण्याबरोबरच विजेच्या बिलाचाही सामना करावा लागतो. म्हणून विजेच्या दराचे निकष बदलण्याच्या दृष्टीने एक अभ्यास समिती नेमण्याची भूमिका आपण कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्याकडे मांडली असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे दिली.

पाथर्डी तालुक्यातील शिरापूर, करडवाडी याठिकाणी आयोजित केलेल्या जनता दरबारप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू महाराज शिंदे होते. मंत्री तनपुरे म्हणाले, मागील भाजपच्या सरकारने 40 हजार कोटी महावितरणची थकबाकी थकवली यामुळे थकबाकीचा आकडा वाढला व महावितरणला अनेक अडचणींना आज सामोरे जाण्याची वेळ आली. सुज्ञ शेतकर्‍यांनी शेतीपंपाच्या थकबाकीचे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री तनपुरे यांनी यावेळी केले.

यावेळी माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे, तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, सरपंच सुधाकर वांढेकर, अमोल वाघ, शिवाजी मचेे, जालिंदर वामन, अजय पाठक, शिवसेना विभागप्रमुख पंकज मगर, भैया बोरुडे, युवानेतेेे महेश लवांडे, सरपंच श्रीमती बुधवंत, उपसरपंच नितीन लोमटे, महेंद्र शिरसाट, बाबासाहेब बुधवंत, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका कृषी अधिकारी शिंदे, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.