15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास होणार गुन्हा दाखल

'यांनी' दिले आदेश
15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास  होणार गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राज्यातील साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्तालयाने जारी केले.

15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास  होणार गुन्हा दाखल
साखर कामगारांना थकीत वेतन मिळवून द्या

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत एक आदेश जारी केला असून त्यात म्हंटले आहे की, सन 2022-23 या चालू वर्षीच्या गाळप हंगाम दि. 15 ऑक्टोबर 2022 पासून सुरू करावा असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झालेला आहे. जे कारखाने गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप सुरू करतील अशा कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या दि. 19 सप्टेंबर 2022 मधील झालेल्या सभेत देण्यात आलेले आहेत. दि. 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी कारखाना सुरु केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेश, 1984 मधील खंड 4 चा भंग होईल.

15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास  होणार गुन्हा दाखल
शिक्षिकेवर शिक्षकाचा अत्याचार

जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 मधील खंड 3 नुसार केंद्र शासनास प्राप्त झालेल्या अधिकारान्वये केंद्र शासनाने ऊस नियंत्रण आदेश 1966 पारित केलेला आहे. सदर आदेशातील खंड 7 नुसार साखर कारखान्यांना गाळप परवाना घेतल्याशिवाय ऊस गाळप करता येणार नाही अशी तरतूद आहे.

15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास  होणार गुन्हा दाखल
मंत्रालयात दोन-तीन वेळा गेलेल्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये

ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील खंड 6 (अ), (ई) आणि (1) आणि उपखंड 1 नुसार राज्य शासनास प्राप्त झालेल्या अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण आणि ऊस गाळप व पुरवठा विनियमन) आदेश 1984 पारित केलेला आहे. 1984 चे आदेशातील खंड 4 नुसार प्रत्येक साखर कारखान्यांना दर वर्षी ऊस गाळप करण्यापूर्वी गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे.

15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास  होणार गुन्हा दाखल
नेवासाफाटा येथील तीन हॉटेलांवर पोलिसांचे छापे

वरील प्रमाणे शासनाचे निर्देशानुसार सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर/मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येते की, दि. 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी ऊस गाळप कोणत्याही परिस्थितीत सुरू करू नये. गाळप परवाना घेऊनच दि. 15 ऑक्टोबर 2022 पासून गाळप सुरू करावे. अन्यथा शासनाचे वरील निर्देशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करणेत येईल.

15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास  होणार गुन्हा दाखल
एका दिवसात नगर जिल्ह्यात 368 जनावरांना लम्पीची बाधा

संबंधित विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दि. 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी ऊस गाळप सुरू करणार्‍या साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी वरील प्रमाणे शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी.

15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास  होणार गुन्हा दाखल
सत्तेचा दुरूपयोग केल्याचे सिध्द झाल्यास राजकारणातून संन्यास - आ. तनपुरे

संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना कळविण्यात येते की, प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप सुरू करणार्‍या कारखान्यांच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्याकडे कळविल्यानंतर आपण संबंधित कारखान्याच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करणेस संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना सूचना द्याव्यात असे आदेश सर्व विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना देण्यात आले आहेत.

15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास  होणार गुन्हा दाखल
निळवंडे धरणाच्या नावाखाली विखे कुटुंबियांना बदनाम करण्याचे षडयंत्र - ना. विखे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com