कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)-

कोपरगाव शहरातील गोखरू बाबा गल्ली येथील गोठ्यातील म्हशी चोरून नेल्याचे प्रकरण घडले होते

त्याचा तपास पोलिसांनी लावला. त्यातील दोन जणांना अटक करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे.

कोपरगाव शहरातील गोकुरबाबा गल्लीत राहणारे अजहर इस्माईल शेख यांच्या सव्वालाख किमतीच्या दोन म्हशी मंगळवारी रात्री आकाश संजय रोकडे, हरीश चंद्रकांत कुर्हाडे, व सचिन गायकवाड सर्व राहणार खेडकर गल्ली कोपरगाव यांनी चोरून नेल्या असल्याची फिर्याद दिली होती.

सदर फिर्याद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बारसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पुंड, पो.कॉ. सुरज अग्रवाल, पो.ना. कोरेकर, पो.कॉ. शिंदे यांनी सापळा लावून व पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.आरोपी सचिन गायकवाड हा पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींजवळ जवळ 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दोन जाफराबादी व एक गावरान अशा तीन म्हशी ताब्यात घेण्यात कोपरगाव शहर पोलिसांना यश आले आहे.