मोर्चा काढणार्‍या शिवप्रहार प्रतिष्ठानच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

मोर्चा काढणार्‍या शिवप्रहार प्रतिष्ठानच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

40 दिवसांपासून मुलगी बेपत्ता आहे, पोलीस तिचा शोध घेत नाहीत म्हणून शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने काल श्रीरामपुरात लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात आला. पोलिसांना रितसर निवेदन दिले.

मात्र, तरीही शिवप्रहार प्रतिष्ठानच्या प्रमुख कार्यकर्त्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईचा शिवप्रहारने तीव्र निषेध केला आहे. आतापर्यंत श्रीरामपुरात निघालेल्या मोर्चांवरही असेच नियम लावून कारवाई केली जाते का? असा सवाल शिवप्रहार प्रतिष्ठानने केला आहे.

एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीस गेल्या 40 दिवसापासून पळवून नेले म्हणून या तरूणीचा पोलिसांनी शोध घेवून आरोपीला अटक करावी यासाठी शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलिसांना तातडीने सदर पळवून नेणार्‍या आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घ्यावा, याप्रकरणी तातडीने तपास न केल्यास चार दिवसात शहर बंदचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठाणचे प्रमुख सुरज आगे यांनी दिला.

या मोर्चात कोणताही आरडाओरडा, गोंधळ नव्हता. शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने न्याय्य हक्कासाठी हा मोर्चा असताना शहर पोलिसांनी मोर्चेकरांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com