भर रस्त्यात मोठा वटवृक्ष कोसळला; वाहतुकीस अडथळा

भर रस्त्यात मोठा वटवृक्ष कोसळला; वाहतुकीस अडथळा

तळेगाव दिघे l वार्ताहर

संगमनेर (sangamner) तालुक्यातील निमोण (nomon) येथील ओढ्यातील डांबरी रस्त्यावर मोठा वटवृक्ष (banyan tree) कोसळला. तळेगाव दिघे (talegoan dighe) मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर (loni-nandur shingote road) रविवारी ( दि. १० ) दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास ही वटवृक्ष कोसळण्याची घटना घडली.

सुदैवाने वटवृक्ष रस्त्यावर कोसळला त्याचवेळी दुचाकी, चारचाकी वाहन अथवा कुणी या रस्त्यावरून प्रवास करीत नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना (big accident) घडली असती.

निमोण येथे ओढ्यातील डांबरी रस्त्याच्याकडेला मोठे वटवृक्ष आहेत. अनेक वर्षाच्या इतिहासाचे ते साक्षीदार म्हणावे लागतील. त्यातील एका वटवृक्ष अखेर रविवारी दुपारी डांबरी रस्त्यावर कोसळला. मात्र त्याचवेळी दुचाकी, चारचाकी वाहन अथवा कुणी या रस्त्यावरून प्रवास करीत नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

वटवृक्ष रस्त्यावर कोसळल्याचे समजताच अनेक ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. डांबरी रस्त्यावरच वटवृक्ष कोसळल्याने लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सायंकाळी सदर वटवृक्ष रत्याच्याबाजूला घेण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.