
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) नजीकच्या तुकाईचे लवण येथील बोअरवेलमध्ये (Borewell) पाच वर्षाचा मुलगा पडल्याची घटना सोमवारी ( दि.13) सायंकाळी घडली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळवर बचाव कार्य सुरू आहे.
सागर बुद्धा बारेला असे मुलाचे नाव असून तो मध्यप्रदेशातील ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये (Borewell) सोमवारी सायंकाळी खेळत असताना तो यात पडला. घटनेची माहिती तात्काळ कर्जत पोलिसांना (Karjat Police) देताच प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस कॉन्स्टेबल अमित बरडे, गोवर्धन कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मुलाला वाचवण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. जेसीबीच्या मदतीने माती काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. 108 रुग्णवाहिका तसेच अग्निशमन गाड्या घटनास्थळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे आणि अहमदनगर येथून आपत्ती निवारण दलाचे पथक (Disaster Relief Team) मदत कार्यासाठी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरूच होते. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत 12 फूट खोलीवर बाजूचे उत्खनन (Excavation) करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.