नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसह 91 जणांची करोनावर मात

पुणे येथील 36 जणांचे अहवालही निगेटिव्ह
नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसह 91 जणांची करोनावर मात

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

टाकळी ढोकेश्वर (Takli Dhokeshwar) येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील (Kendriya Jawahar Navodaya Vidyalaya) विद्यार्थी, कर्मचारी तसेच शिक्षक अशा सर्व 90 जणांनी करोनावर यशस्वी मात (Corona Discharge) केली असून त्यांची सुखरुप रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान पुणे (Pune) येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले येथील 36 जणांचे अवालही निगेटिव्ह (Report Negative) आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसह 91 जणांची करोनावर मात
‘समृद्धी’ महामार्गावरील प्रवासासाठी 1213 रुपयांचा टोल

डिसेंबर मध्ये नवोदय विद्यालयात करोनाचा शिरकाव होऊन विद्यार्थ्यांना बांधा झाल्याचे समोर आले होते. जिल्हासह राज्यातील शिक्षण क्षेत्रात ऐकच खळबळ उडाली होती. आरोग्य यंत्रणा महसुल विभाग पारनेरचे प्रशासन सर्व यंत्रणा कामाला लागली होती. निवासी शाळा आसताना इतक्या मोठ्या प्रमाणात बांधीत झाल्याने पालकानी संताप व्यक्त केला. तर आरोग्य यंत्रणा कामाला लागत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली . यात 85 विद्यार्थी व 6 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे 91 जण बाधीत आढळले.

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसह 91 जणांची करोनावर मात
लाल कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

या सर्वावर पारनेर ग्रांमीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम होती परंतु त्याचे अहवालात पाँझीटिव्ह आले होते. तर यातील 36 जणांच्या पुढील तपासण्या करण्यासाठी पुण्याला नमुने पाठवले होते. दरम्यान आमदार लंके यांनी आपली यंत्रणा कामाला लावत आरोग्य विभागाला सर्व सहकार्य केले तर हे बरे होईपर्यंत मी यांचे पालकत्व घेत आहे असे म्हणत पालक तसेच विद्याथ्यर्त्तंना मोठा धीर दिला होता. आठ दहा दिवस उपचार घेतल्यानंतर सोमवारी यातील 14 जणांना घरी सोडण्यात आले होते. तर आज सर्व विद्यार्थी व शिक्षक बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत. सध्या नवोदय विद्यालयात विलगीकरण केलेले दहावी व बारावीचे विद्यार्थी वगळून इतर 226 विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे .तर उपचार घेतलेले 85 विद्यार्थी व 6 कर्मचारी ही सुखरूप घरी गेले आहेत .

पुणे येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालाचा काही रिपोर्ट आला नाही. अहवाल पॉझिटिव्ह नसतील तर पाठवले जात नाहीत. याचा अर्थ सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर विद्यार्थ्यांनाही कुठलाही त्रास झाला नसल्याने सर्व विद्यार्थी ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

- डॉ प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी पारनेर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com