जिल्ह्यात आतापर्यंत 90 टक्के पाऊस

शनिवारी रात्री आणि रविवारी नगरमध्ये संततधार
जिल्ह्यात आतापर्यंत 90 टक्के पाऊस
पाऊस File PhotoRain

अहमदनगर (प्रतिनिधी)-

नगर शहरात पावसाची संततधार कायम असून शनिवारी रात्रभर पाऊस बरसल्यानंतर रविवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. दरम्यान दुपारी चारनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. दिवसभर नगर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात आभाळ भरून येत संततधार पाऊस सुरू होता. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाची सरासरीच्या 409 मि.मी. पावसाची नोंद झाली असून टक्केवारीत हा पाऊस 90 टक्के आहे.

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रभर संततधार पडत होता. रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्यावर दुपारी चारच्या सुमारास पुन्हा संततधार चालू आहे. आज सोमवारी श्रावणी पोळा सण असून बाजारात मातीची बैलजोडी विकण्यास बसलेल्यांची माल वाचवताना तारांबळ उडाली. यासह पोळा सणासाठी साज विक्री करणार्‍यांचे हाल झाले. येत्या 9 तारखेपर्यंत राज्यात मुसधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिलेली असून यात ढगांच्या गडगटांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. खास करून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा प्रार्दभाव अधिक राहणार आहे. दरम्यान, नगर जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर दरम्यान 448.1 पाऊस दरवर्षी पडत असतो. यात रविवार (दि.5) अखेर जिल्ह्यात 409. 2 टक्के पाऊस झालेला असून त्याची टक्केवारी 90 टक्के आहे.

तालुकानिहाय सरासरी (मिली मीटरमध्ये)

नगर 424.6, पारनेर 306.9, श्रीगोंदा 368.9, कर्जत 342.2, जामखेड 445.6, शेवगाव 516.9, पाथर्डी 638.1, नेवासा 383.3, राहुरी 393.5, संगमनेर 284.1, अकोले 549.6, कोपरगाव 403.9, श्रीरामपूर 427.2, राहाता 331.3.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com