अवघ्या 9 टक्के लोकांनी घेतले दोन्ही डोस

करोना लसीकरण : पहिला डोस घेणार्‍यांची संख्या 24 टक्के
अवघ्या 9 टक्के लोकांनी घेतले दोन्ही डोस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारकडून (Central Government) मिळणारी अपूरी लस (Vaccine), लसीकरणात येणार्‍या अडचणी (Problems with vaccination) यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 24 टक्के लोकांनी पहिला, तर 9 टक्के लोकांनी करोना लसीचा दुसरा डोस (second dose of corona vaccine) घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 12 लाख 95 हजार डोस संपले आहेत. अशी परिस्थित राहिल्यास जिल्ह्यात करोनाचे (District Covid 19) शंभर टक्के लसीकरण कधी पूर्ण हा प्रश्‍न आहे.

16 जानेवारीपासून जिल्ह्यात करोना लसीकरणाची मोहीम (Corona vaccination campaign in the district) सुरू झाली. प्रारंभी आरोग्य कर्मचारी (Health workers), त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचार्‍यांचे लसीकरण (Vaccination of frontline employees) करण्यात आले. सध्या जिल्ह्यात (District) 38 लाख 87 हजार 545 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 9 लाख 35 हजार 132 नागरिकांना पहिला डोस, तर 3 लाख 60 हजार 204 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे एकूण आतापर्यंत 12 लाख 95 हजार 336 डोस संपले आहेत.

यात कोविशिल्ड लसीचे (Covishield vaccine) 10 लाख 1 हजार 670 डोस, तर कोव्हॅक्सिन लसीचे 2 लाख 76 हजार 580 डोसचा समावेश आहे. सध्या दररोज सहा ते दहा हजार लोकांचे लसीकरण होत आहे. सध्या 18 वर्षांपुढील सर्वांचेच लसीकरण सुरू झाल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी (Vaccination Center Crowd) होत आहे. जिल्ह्यात 162 केंद्रांवर लसीकरण (Central Vaccination) होत असून त्यात ग्रामीण रूग्णालये (Rural Hospital), प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center), नगर शहरातील महापालिकेचे केंद्र (Municipal Center), तसेच काही खासगी दवाखान्यांतील केंद्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून करोनाने पुन्हा डोकवर काढण्यास सुरूवात केली आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावलेले असले तरी संसर्ग वाढतांना दिसत आहे. करोनावर मात करण्यासाठी एकतर सामुहिक प्रतिकार शक्ती अथवा शंभर टक्के असे पर्याय असल्याने जिल्ह्यातील करोना लसीकरणाचा वेग पाहिल्यास जिल्ह्यासाठी पुढील काळ खडत असल्याचे चित्र सध्या आहे.

पहिला डोस आणि कंसात दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी 44 हजार 937 (35 हजार 427), फ्रंटलाईन वर्कर 59 हजार 448 (29 हजार 877), 18 ते 45 वयोगट 2 लाख 40 हजार 556 (32 हजार 299), 45 ते 60 वयोगट 3 लाख 2 हजार 873 (1 लाख 25 हजार 129), 60 वर्षांपुढील 2 लाख 87 हजार 318 (1 लाख 37 हजार 472) असे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com