जुगार खेळताना 9 जण रंगेहाथ पकडले

आरोपींमध्ये सेनेच्या पदाधिकार्‍याचा समावेश
जुगार खेळताना 9 जण रंगेहाथ पकडले

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - शहरात जुगार खेळताना शिवसेनेचा पदाधिकारी असलेला काका शेळके याच्यासह नऊ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सिव्हील हडको येथील गणेश चौकातील वैष्णवी लॉटरी येथे आरोपी जुगार (gambling) खेळत होते. त्यावेळी तोफखाना पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली.

यांसदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात पोकॉ. शैलेश उत्तमराव गोमसाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी काकासाहेब चंद्रकांत शेळके, सुनील डेव्हिड हिवाळे, मिलिंद मोहन मगर, बंडू गणपत भोसले, नितीन कुशालचंद गुगळे, अमोल पांडुरंग ढापसे (सर्व रा. सिव्हील हडको), महेश अशोक ओझा, अनिकेत राजेंद्र ओझा (दोघेही रा. भिंगार) आणि अनिल मोहन मगर (रा. सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना अटक करून त्यांची जामिनावर सुटका झाली.

रविवार दि. 4 जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी काकासाहेब शेळके हा स्वत:च्या फायद्याकरिता आरोपी सुनील हिवाळे, मिलिंद मगर, बंडू भोसले, नितीन गुगळे, अमोल ढापसे, महेश ओझा, अनिकेत ओझा आणि अनिल मोहन मगर यांना पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळवत होता. आरोपींकडून सहा हजार 350 रुपयांची रोख रक्कम व तिरट जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com