देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर

देशात 315 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित
देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर

नेवासा l सुखदेव फुलारीl Newasa

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात भारतातील  एकूण 471 साखर कारखान्यांनी 14 डिसेंबर 2021 अखेर 820.73 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 75.65 लाख मेट्रिक टन  साखर उत्पादित केली आहे.

देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर
International Tea Day 2021 : आज दिवस 'चहा'त्यांचा! जाणून घ्या चहाचा रंजक इतिहास...

देशातील सरासरी साखर उतारा 9.22 टक्के आहे. ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक (341.18 लाख मे.टन) तर उर्वरित भारतात सर्वात कमी (1.18 लाख मे.टन) ऊसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामात 315 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सन 2021-22 च्या गळीत हंगामात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, अंध्रप्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, तेलंगाणा, उत्तराखंड व उर्वरित भारतातील 471 साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू आहे.

देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

उत्तर प्रदेश राज्यातील 117 कारखान्यानी 197.87 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 18.60 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. महाराष्ट्र राज्यातील 184 कारखान्यानी 341.18 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 31.90 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. कर्नाटक राज्यातील 69 कारखान्यानी 198.89 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 16.60 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. गुजरात राज्यातील 15 कारखान्यानी 23.73 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 2.10 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. आंध्र प्रदेश राज्यातील 4 कारखान्यानी 1.25 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 0.10 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. बिहार राज्यातील 8 कारखान्यानी 12.57 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 1.15 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली.

देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर
Photo : 'ही' आहेत देशातील TOP 10 सर्वात पॉवरफुल कपल

हरियाणा राज्यातील 14 कारखान्यानी 13.58 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 1.10 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. मध्य प्रदेश राज्यातील 19 कारखान्यानी 6.25 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 0.50 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. पंजाब राज्यातील 16 कारखान्यानी 6.86 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 0.60 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. तामिळनाडू राज्यातील 9 कारखान्यानी 5.88 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 0.50 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. तेलंगाणा राज्यातील 6 कारखान्यानी 5.88 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 0.20 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. उत्तराखंड राज्यातील 7 कारखान्यानी 9.00 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 0.90 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली. उर्वरित भारतात तील 3 कारखान्यानी 1.18 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 0.10 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली.

देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर
जाणून घ्या; 'इम्पिरिकल डेटा' म्हणजे नेमकं काय?, OBC आरक्षणासाठी का आहे महत्वाचा?

14 डिसेंबर 2021 अखेर भारत देशातील एकूण ऊस गाळप,साखर उत्पादन, साखर उतारा असा...

राज्य--ऊस गाळप (लाख मे.टन)--साखर उत्पादन (लाख मे.टन)-- साखर उतारा(%)

उत्तर प्रदेश--197.87--18.60--9.40

महाराष्ट्र--341.18--31.90--9.35

कर्नाटक--198.89--17.90--9.00

गुजरात--23.73--2.10--8.85

आंध्रप्रदेश--1.25--0.10--8.00

बिहार-- 12.57--1.15-- 9.15

हरियाणा--13.58--1.10-- 8.10

मध्य प्रदेश--6.25--0.50--8.00

पंजाब-- 6.86--0.60-- 8.75

तामिळनाडू--5.88-- 0.50-- 8.50

तेलंगाणा--2.50--0.20-- 8.00

उत्तराखंड--9.00--0.90-- 10.00

उर्वरित भारत--1.18-- 0.10--8.50

---------------------------------------

एकूण:- 820.73 -- 75.65-- 9.22

देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर
उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण

सन 2021-22 या गळीत हंगामात भारत देशात एकूण 315 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. राज्य निहाय अपेक्षित साखर उत्पादन असे...

उत्तर प्रदेश (107.00लाख मे.टन), महाराष्ट्र (110.00लाख मे.टन), कर्नाटक (48.00लाख मे.टन), गुजरात (11.00लाख मे.टन), आंध्रप्रदेश (2.00लाख मे.टन), बिहार (5.50लाख मे.टन), हरियाणा (7.00लाख मे.टन), मध्य प्रदेश (4.50लाख मे.टन), पंजाब (5.00लाख मे.टन), तामिळनाडू (9.00लाख मे.टन), तेलंगाणा (1.00लाख मे.टन), उत्तराखंड (4.00लाख मे.टन), उर्वरित भारत (1.00लाख मे.टन).

मागील सन 2020-21 च्या गळीत हंगामात देशभरातील 458 साखर कारखान्यानी 819.57 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 311.05 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली होती.

देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?
देशातील 471 साखर कारखान्यांकडून 820 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप; महाराष्ट्र आघाडीवर
लस घेणार नाही म्हणजे नाही!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com