अकोले ग्रामीण रुग्णालयात 8 हजार लसीकरण पूर्ण

अकोले ग्रामीण रुग्णालयात 8 हजार लसीकरण पूर्ण

अकोले (प्रतिनिधी) - अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दि. 15 मे पर्यंत 8000 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर सुरुवातीला काही दिवस नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. मात्र त्यात काही प्रमाणात सुधारणा करून ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने को-व्हेक्सिन व कोविशील्ड यांचे लसीकरण दररोज सुरू आहे.

आदल्या दिवशी आरोग्य विभागाकडून दुसर्‍या दिवशी चे लसीकरण संदर्भातील उपलब्धता व नियोजन ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त होते, त्यानुसार रुग्णालयाच्या बाहेर बोर्डवर नागरिकांकरिता सूचना वजा माहिती दिली जाते. ज्या दिवशी लसीकरण असेल ती तारीख व कोणत्या प्रकारचे लसीकरण केले जाईल, लसीकरण करण्याची वेळ, नागरीकांचा वयोगट लसीचा क्रमांक, पहिली किंवा दुसरी इत्यादी सर्व माहिती बोर्डवर लिहिलेली असते. प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी पहाटे पाच पासूनच नागरिक रांगेत उभे असतात.

सुदैवाने रुग्णालय परिसर अत्यंत विस्तीर्ण व झाडांच्या सावलीत नियुक्त असल्याने सोशल डिस्टन्स पाळून साधारणपणे दीडशे रिंगण जमिनीवर आखलेले आहेत. त्यावर त्यावर क्रमांक टाकलेले आहेत. नंबर लावण्यासाठी आलेले नागरिक आपापल्या रिंगणात उभे राहतात. त्यामुळे वाद होत नाहीत, क्रमवारीने येईल तो आपल्या रिकाम्या असलेल्या रिंगणात उभा राहतो. दोन रिंगणातील अंतर जास्त असल्याने सोशल डिस्टन्स पाळला जातो. त्यानंतर आलेल्या नागरिकांची नाव नोंदणी रजिस्टरवर केली जाते. रजिस्टर वरील क्रमांकानुसार संबंधित नागरिकांना त्याच क्रमांकाचे टोकन दिले जाते. साधारणपणे नऊ साडे नऊ पर्यंत प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होते. टोकन घेतलेला नागरिक आपापल्या क्रमांकानुसार अंदाज पाहून इतरत्र झाडाखाली बसून राहतात एका वेळेस 10 टोकन धारक नागरिक लसीकरण केंद्रात सोडले जातात. त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष लेस घेण्यासाठी स्वतंत्रपणे नियोजन केले आहे. तेथेही सोशल डिस्टन चे पालन केले जाते ही पद्धत अवलंबली जाते. यामुळे कोणतीही गर्दी होत नाही.

आपला टोकन क्रमांक वरील नंबर नुसार परिसरात बसलेले नागरिक लसीकरण साठी तयार असतात. फळ्यावर संपूर्णपणे लसीकरणाची माहिती उदाहरणार्थ वयोगट हा प्रकार वेळ दिनांक ही सर्व माहिती दिलेले असल्याने अत्यंत सोडत पद्धतीने अकोले ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचा कार्यक्रम पार पडत आहे.

यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे, डॉ. साळुंखे, डॉ. चव्हाण, डॉ. देसाई व संपूर्ण स्टार तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर राहुल गोपाळे, निलेश दुशिंग, घुले, सुनील डोके व अल्ताफ शेख यांचे मोलाचे सहकार्य असते. हा संपूर्ण पॅटर्न यशस्वीपणे राबविण्यासाठी अकोले ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समिती सदस्य व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे सातत्याने प्रयत्नशील असतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com