अकोले तालुक्यात 9 करोनाबाधीत आढळले
सार्वमत

अकोले तालुक्यात 9 करोनाबाधीत आढळले

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

तालुक्यात करोनाची साडेसाती संपायचे नाव घेत नाही. गुरुवारी रात्री उशिरा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शेरणखेल गावातील एकाच कुटूंबातील 8 तर कळस जवळील सुलतानपुर येथे एक अशी 9 जणांचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

यामध्ये शेरणखेल येथील 86 वर्षीय, 58 वर्षीय, 32 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 52 वर्षीय,40 वर्षीय, 30 वर्षीय पुरुष 13 वर्षीय मुलगा तर सुलतानपुर येथील 25 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

याच बरोबर तालुक्यातील 43 जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये माणिक ओझर, कोतुळ, जांभळे बेलापुर, चितळवेडे, निळवंडे, शेरणखेल, रेडे, सुलतानपुर व शहरातील शाहूनगर येथील व्यक्ती अशी 43 अहवाल निगेटिव्ह आले. ही समाधानाची बाब आहे.

तालुक्यातील कळस बुद्रूकमध्ये 25 वर्षाच्या तरूणीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. सदर तरूणीच्या निमगाव येथील चुलता पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात येताच कुटूंबातील तीन स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. सदर तरूणी तिच्या चुलत्यांच्या संपर्कात आली असल्याने सदर तरूणीचे रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

करोना महामारीची बाबतीत कटाक्ष असलेल्या आणि जास्तीत जास्त नियम पाळलेल्या गावात देखील नागरीकांच्या हलगर्जीपणा मुळे करोनाने कळस बु हद्दीत आपले स्थान निर्माण केले आहे.यावेळी अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सदर भागास भेट देत कळस बु येथील इंदिरा नगर गल्ली कंटेटमेंट झोन म्हणुन घोषित केली आहे. सदर विभाग बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे

तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता तालुक्यातील एकूण रुग्ण संंख्या 120 झाली आहे. त्यापैकी 68 जण करोनामुक्त झाले आहेत.आत्तापर्यंत तालुक्यातील 3 जण मयत झाले असून सध्या 49 जणांवर उपचार सुरु आहे. दररोज एकेक नवीन गाव करोनाच्या यादीत येत आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे.

घरात रहा, सुरक्षित रहा असे आवाहन प्रशासन व सामाजिक संघटना यांच्याकडून करण्यात येत असले तरी लोक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र अकोलेत दिसत आहे. अनेकजण दुचाकी-चार चाकी वाहनाधारक व प्रवास करणारे विना मास्क फिरताना दिसून येत आहे. अशा लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा पोलीस यंत्रणेने उगारला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com