जिल्ह्यात आज सकाळी आढळले ८ करोनाबाधित
सार्वमत

जिल्ह्यात आज सकाळी आढळले ८ करोनाबाधित

७५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हा रुग्णलयातील करोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ८ जण करोना बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे.

आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एक रुग्ण तर श्रीगोंदा तालुक्यातील चंदगाव ०१, कोळगाव ०१, अजनुज ०१, देवदैठण ०१ आणि घारगाव येथील ०३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच सकाळी ७५ रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज बाधित आढळलेल्या रुग्णासह उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ इतकी झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com