Corona
Corona
सार्वमत

अकोले शहराला पुन्हा करोनाचा धक्का...!

काल दिवसभरात तालुक्यात एकूण ०८ करोना बाधित आढळून आले.

Nilesh Jadhav

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत चालल्याचे शुक्रवारी दिवस भरात आलेल्या अहवालातून पुढे आले आहे. काल दिवसभरात तालुक्यात एकूण ०८ कोरोना बाधित आढळून आले. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा अकोले शहरातील तीन व तालुक्यातील लहित येथील एक व्यक्ती असे चार करोना बाधित आढळून आले आहेत .

दिवसभरात अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील एक व शहरातील कारखाना रोडवरील एका पक्षाच्या पदधिकाऱ्यासह तीन असे चार जण पॅाझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिरा अहमदनगरहून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील कारखानारोड वरील हासे कॅाम्पलेक्समधील पूर्वीच्या बाधिताच्या कुटुंबातील एक ४४ वर्षीय महिला, २४ व २५ वर्षीय दोन असे तीन व तालुक्यातील लहित येथील २६ वर्षीय महिला असे चार जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात शहरात ०६, बहिरवाडी व लहित येथील प्रत्येकी एक असे एकूण ०८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ५८ झाली आहे. अकोले तालुक्यातसह शहरात रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल अकोले शहरात व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत आपल्या सोयीने दुकाने सुरू होण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने महात्मा फुले चौकपासून लगतच्या प्रमुख रस्त्यांवर 200 मीटर पर्यंतचा परिसर बफर्स झोन जाहीर केला आहे. त्यामुळे करोना पेक्षा व्यवसाय सुरू ठेवण्याचा व्यापाऱ्यांच्या अतिउत्साहीपणाच्या निर्णयामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांतच अगोदर जाहीर केल्या प्रमाणे 20 जुलै पर्यंत बंद ठेवला असता तर बरे झाले असते अशी चर्चा ऐकू येत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com