संगमनेर (शहर प्रतिनिधी) -

सहकार महर्षी थोरात साखर करखान्या जवळील पतसंस्थेचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने 76 हजार रुपये लांबवल्याची घटना

गुरुवारी रात्री घडली.

चोरट्याने रात्रीच्यावेळी पतसंस्थेचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पतसंस्थेच्या ड्रॉवर मधील 76 हजार 459 रुपये अज्ञात चोरट्याने लांबवले. पतसंस्थेत चोरी झाल्याचे सकाळी लक्षात आले. याबाबत दत्तात्रय क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1963/2020 भारतीय दंड संहिता 457, 454, 380 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करीत आहे.