कौटुंबिक न्यायालयात 705 प्रकरणे निकाली

कौटुंबिक न्यायालयात 705 प्रकरणे निकाली

न्यायाधीश कंक : मध्यस्थी व समुपदेशकांची भूमिका महत्वाची

अहमदनगर (प्रतिनिधी)

न्यायालयामधील अपासातील वाद मिटवण्यामध्ये मध्यस्थी व समुपदेशक महत्वाची भूमिका बजावत असल्याने अनेक केसेस निकाली लागत आहेत. गेल्या वर्षभरात नगरच्या कौटुंबिक न्यायालयात (Family Court) असलेल्या 876 केसेस पैकी 705 केसेस मध्यस्थी व समुपदेशनाच्या माध्यमातून सामुचाराने निकाली निघाल्या असल्याची माहिती न्यायाधीश नेत्रा कंक (Family Court Judge Netra Kank) यांनी दिली.

25 सप्टेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर नगरच्या कौटुंबिक न्यायालयात शहर वकील संघटना व सेंट्रल बार असोसिएशनच्या (Ahmednagar Bar Association) वतीने मध्यस्थी प्रक्रीयेबाबत जागरूकता या कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश कंक बोलत होत्या. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, सेंट्रल बारचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष काकडे, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, प्रमुख वक्त्या अ‍ॅड. नीलमणी गांधी व अ‍ॅड. प्रज्ञा हेंद्रे, कौटुंबिक न्यायालायाचे अधीक्षक नवाझ शेख, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. शिवाजी कराळे, महिला सचिव अ‍ॅड. मीनाक्षी कराळे आदींसह वकील उपस्थित होते.

दरम्यान शहरातील जुने जिल्हा न्यायालयात (National People's Court) सुरू असलेल्या कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी (women lawyers) स्वतंत्र बार रूमचा प्रारंभ न्यायाधीश कंक यांच्या हस्ते झाला. अहमदनगर बार असोसिएशनने न्यायालयाकडे महिला वकिलांकरीत स्वतंत्र वकील कक्ष मिळण्याची मागणी केली होती. यावर उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयांना नुकतेच कौटुंबिक न्यायालयात काम करणार्‍या महिला वकीलांना स्वतंत्र वकील कक्ष मंजूर करण्यात आल्याचे पत्र दिले. त्याप्रमाणे जिल्हा न्यायालयाने अहमदनगर बार असोसिएशनला सदरचे महिलांचे वकील कक्ष वापरण्यास परवानगी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com