जिल्ह्यात आज करोना बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ
सार्वमत

जिल्ह्यात आज करोना बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ

उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ९२५

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत करोना बधितांच्या रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९२५ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २२६२ इतकी झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात करोना टेस्ट लॅबमध्ये आढळून आलेल्या ७० बाधित रुग्णामध्ये संगमनेर तालुका २४, पारनेर तालुका ०१, श्रीगोंदा तालुका ०५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २३, श्रीरामपूर ३ तर राहुरी येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com