शेतकर्‍यांनी मुदतीच्या आत 7 नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावेत - ना.काळे

आमदार आशुतोष काळे
आमदार आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी चालू खरीप हंगामातील उभी पिके तसेच पेरणी झालेली पिके, चारा पिके, अन्न धान्य, कडधान्य व तेल बियांच्या पिकांना गोदावरी कालव्यातून पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी 7 नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार असून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांनी तातडीने जास्तीत जास्त 7 नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे खात्याच्या संबंधित शाखा कार्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन ना.आशुतोष काळे यांनी केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात ना.काळे यांनी म्हटले आहे, गोदावरी कालव्यातून खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. वेळेत 7 नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणार्‍या सर्वच शेतकर्‍यांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. भविष्यात पावसाने उघडीप दिल्यास उभ्या पिकांना पाण्याची गरज भासू शकते त्यावेळी या आवर्तनाचा लाभ शेतकर्‍यांना होईल. त्यासाठी 19 ऑगस्ट पर्यंत सर्व लाभधारक शेतकर्‍यांनी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाला पाणी वाटपाचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी 7 नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीच्या आत दाखल करावेत, असे आवाहन ना. काळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com