बिबट्याच्या हल्ल्यात ७ शेळ्या ठार, परिसरात भितीचे वातावरण

(प्रतिकात्मक छायाचित्र)
(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोपरगाव(तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील आप्पासाहेब बच्छु दवंगे यांच्या शेडवर बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केल्याने सात शेळ्या ठार झाल्या आहे. सदर घटनेने पशु पालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील आप्पासाहेब बच्छु दवंगे यांच्या शेळ्याच्या शेडवर घरी कोणी नसताना रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या मयत झाल्या आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच डॉकटर व वनअधिकारी यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. कोपरगाव तालुक्यात बिबट्या व अन्य हिंसक वन्यजीवचे हल्ले सातत्याने पशुधनावर व मानवांवर होत असून नागरिकांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. सदर घटनेने शेतकरी दवंगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आधीच लम्पी आजाराने शेतकरी संकटात असताना जंगली वन्य जीवांच्या हल्ल्यात मृत होत असलेल्या जनावरांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सदर प्रसंगी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे, वनविभाग कर्मचारी संजय गोसावी, डॉ. प्रहार तालुका संपर्क प्रमुख नवनाथ वाघ, शुभम काळे, माहेगाव, सिद्धार्थ रोकडे, विनोद दवंगे, उदय दवंगे, अविनाश दवंगे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com